टेक कंपनीने मातीची किंमत शिकवली!
@Zoho या टेक कंपनीने मला आणि
@akashjadhav_if ला ‘झोहोलिक्स २०२६’साठी चेन्नईला बोलावलं. टेक कंपनी म्हंटल्यावर सॉफ्टवेअर, टेक्नॉलॉजी आणि ऑफिस बघायला मिळेल, असं आम्हाला वाटलं. पण तिथे गेल्यावर वेगळाच अनुभव आला.
झोहोचा कॅम्पस बघताना वाटलं, हे टेक ऑफिस आहे की एखादी युनिव्हर्सिटी? मोठ्या इमारती, झाडं, मोकळ्या जागा, तळी आणि पाण्याची व्यवस्था सगळंच छान होतं. पण सगळ्यात जास्त लक्षात राहिली तिथली 'माती.'
@RootedInZoho चं काम बघताना एक गोष्ट मनाला भावली. कॅम्पस उभारताना निघालेली माती त्यांनी कचरा म्हणून बाहेर न फेकता त्याच मातीच्या टेकड्या तयार केल्या आणि त्यावर हजारो झाडं लावली.
हे पाहताच मला माझं शेत आठवलं. नुकतीच मी ४-५ लाख रुपये खर्च करून माझ्या शेतासाठी माती मागवली होती. कारण, चांगल्या पिकासाठी चांगली माती असणं किती गरजेचं आहे हे माझ्याहून जास्त कोणाला माहिती?
गेल्या दहा वर्षांपासून मी शेती करत आहे, पण ३० वर्ष झालेल्या झोहोचं काम बघून मला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे असं वाटलं.
'झोहोलिक्स'ला टेक्नॉलॉजी बघायला गेलो होतो, पण परतताना ‘इंडियन फार्मर’साठी पुढच्या तीस वर्षांत आपण काय उभं करायचंय याचा विचार मात्र मनात सुरू झाला आहे, हे नक्की!
-संतोष जाधव (इंडियन फार्मर)